मुंबई पुणे महामार्गावर 21 लाखाची बनावट दारु जप्त, गोव्यावरुन येत होता दारुनं भरलेला ट्रक!

जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली

    पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर  (old mumbai pune highway) गोव्यातून येणारी दारु जप्त करण्यात आली आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department Pune) बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. ट्रकची झडती घेतली असता त्यामधून जवळपास 600 बॉक्स आढळून आले आहेत. लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली. 23 जानेवारीला एक दारुचे बॅाक्स असेलला एक ट्रक (DD-01-2-9205) जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सापळा रचून पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक अडवला आणि त्याची तपासणी केली. यावेळी ट्रकमधून 90 मि.ली. क्षमतेचे जवळपास  600 बॉक्स आढळले. या दारुची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.