
घरच्यांना प्रेमाची कुणकुण लागल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादाययक घटना नागपुरात घडली आहे. धावत्या रेल्वे समोर यांनी उडली घेतली(Lover commits suicide in Nagpur).
नागपूर: घरच्यांना प्रेमाची कुणकुण लागल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादाययक घटना नागपुरात घडली आहे. धावत्या रेल्वे समोर यांनी उडली घेतली(Lover commits suicide in Nagpur).
मृत तरुणाचे वय 18 वर्षे तर तरुणीचे वय 16 वर्षे आहे. दोघेही स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक येथील रहिवासी आहेत. दोन दिवसांपूर्वी दोघेही घराबाहेर पडले होते.
शुक्रवारी रात्री 8 च्या जवळपास कन्हान रेल्वे पुलियाजवळील 100 मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यानी हातात हात घालून हावडा अहमदाबाद धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
मृत मुलगी ही अल्पवयीन आहे. याच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण सुरू होती. दरम्यान दोघांनी दोन दिवसापूर्वी घरून बेपत्ता झाल्याने मुलीच्या घरच्यांनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असता पोलिसांनी मिसिंग ची तक्रार नोंदवित तपासाला गती दिली. मात्र, कुठेही थांगपत्ता लागला नव्हता तर काल रात्री या दोघांनीही सदर घटनास्थळी जीवनाचा कायमचा निरोप घेत हातात हात घालून रेल्वेगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी एम एच 40 डी 2678 दुचाकी मिळाली असून ही दुचाकी मृतकाच्या मोठ्या भावाची असल्याचे सांगण्यात येते.