सीमा हैदर आणि अंजूच्या वाटेवर निघालेल्या प्रेमवीराची फसवणूक! लंडनच्या पोरीने लखनौच्या पोराला लावला लाखोंचा चुना

लंडन येथील तरुणीशी मैत्रीच्या झाल्यानंतर तिने फसवणूक करुन तरुणाकडून 3 लाख 50 हजार रुपये उकळले. या प्रकरणी तरुणाने सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  लखनौ:भारत आणि पाकिस्तानमधील प्रेमप्रकरणं कोडं अद्याप सुटलेलं नाही आहे. आधी सीमा हैदर (Seema Sachin Love story) प्रियकरासाठी भारतात आली त्यांतर राजस्थानच्या अंजूने (Anju nasrullah news) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठलं. हे दोन्ही प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले असता आता सगळ्या प्रेमवीरांनी देश ओलांडून बाहेरच जायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीमा आणि अंजू प्रमाणे ऑनलाईन प्रेमाच्या बंधनात अडकून परदेशात जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या लखनौच्या तरुणाला मात्र, याची चांगलीच किंमत चुकवावी लागली आहे.  सीमेपलीकडे प्रेम शोधणाऱ्या या तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक ( Froud In Online Love) झाली. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

  लखनौचा मुलगा लंडनच्या मुलीच्या प्रेमात

  मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोसाईगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारा अंकित गुप्ता याला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. बोरिस जॉन्सन नावाच्या एका तरुणीने स्वतःला ब्रिटनची रहिवासी असल्याचे सांगितले आणि ती लंडनमध्ये राहते असे सांगितले. मुलीने सांगितले की तिला भारतात एक हॉस्पिटल उघडायचे आहे, त्यासाठी ती जमीन पाहण्यासाठी लवकरच भारतात येणार आहे, त्यावर तरुणाने विश्वास ठेवला. यादरम्यान त्याच्याशी मोबाईल चॅटही सुरूच होते. मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचे नाव आहे हे त्या तरुणाला माहित नव्हते. त्यामुळे त्याला तिच्या नावावर संशयही आला नाही.

  साडेतीन लाखाचा चुना

  एक दिवस अंकितला अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख विमानतळाचे कस्टम अधिकारी रवी वर्मा अशी करून दिली आणि सांगितले की विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला पकडले गेले आहे जो त्याचे नाव बोरिस जॉन्सन सांगत आहे. त्याने बोरिस जॉन्सनला मोठ्या प्रमाणात पौंड मिळाले आहेत, त्यांनी मला तुमचा नंबर दिला आहे.
  यानंतर त्याने अंकितला विचारले की तू बोरिस जॉनसनला ओळखतोस का, हे ऐकून अंकित म्हणाला, हो मला माहीत आहे. यानंतर कॉलरने कथित बोरिस जॉन्सनला सोडण्याच्या बदल्यात तरुणाच्या खात्यात 3 लाख 50 हजार जमा केले आहेत. मात्र, तेव्हा त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली  आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले आणि त्यानंतर तो पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. या प्रकरणी आता सायबर पोलीस तपास करत आहे.