लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी हरप्रीत सिंगला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) फरार दहशतवादी हरप्रीत सिंग याला 1 डिसेंबर रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथून येताच अटक केली.

    नवी दिल्ली : NIA ने लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी हरप्रीत सिंगला अटक केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पंजाबच्या लुधियाना कोर्टच्या बिल्डिंगमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या  या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर त्याला अटक करण्यात NIA ला यश आलं आहेेेेेेेेेेे.

    राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) फरार दहशतवादी हरप्रीत सिंग याला 1 डिसेंबर रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथून येताच अटक केली. हरप्रीत, पाकिस्तानस्थित इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन (ISYF) चा प्रमुख, लखबीर सिंग रोडचा सहकारी आहे आणि डिसेंबर 2021 मध्ये लुधियाना कोर्ट इमारत स्फोटात त्याचा सहभाग होता, अशी माहिती NIA ने दिली.  रोड यांच्या सूचनेनुसार कारवाई करत, हरप्रीतने आयईडी खास बनवलेले होते, जे पाकिस्तानमधून भारतात त्याच्या साथीदारांना पाठवले गेले होते, त्याच्या वितरण करण्यात त्याने मदत केली होती.