
महादेव ऑनलाइन जुगारॲपपच्या प्राथमिक प्रवर्तकांपैकी एक सौरभ चंद्राकर, ॲपपच्या संबंधात कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीच्या चौकशीत आहे.
सध्या बॅालिवूडमध्ये सगळीकडे एकच चर्चा होत आहे, ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor Summones By ED). रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावला आहे.त्याचं कारण आहे एक गेंमीग ॲप. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप (Mahadev online Betting app) असं त्याच्या नाव आहे. या ॲपनं फक्त रणबीर कपूरच नाही तर इतर सिनेकलाकारांनाही अडचणीत आणलं आहे. या महादेव ऑनलाइन गेमींगच्या ॲपच्या माध्यमातून अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे आणि या ॲप बॅालिवूड करांशी असलेल्या संबधवरुन आता ईडिनं त्यांचाही तपास सुरू केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि त्यांचा बॅालिवूडसोबत काय संबध आहे, जाणून घ्या.
नेमकं प्रकरण काय आहे
‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेत आहे. रणबीर कपूर हा ॲपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीनं केला आहे. त्यामुळे त्याला 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी काय संबध
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या कथित आर्थिक अनियमिततेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शेकडो कोटींच्या व्यवहारांचा पर्दाफाश केल्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. या ॲपच्या तपासात बॉलीवूड सेलिब्रिटींचा सहभाग आणि हा ॲप चालवणारा सौरभ चंद्राकर याच्या शाही विवाहसोहळ्यांसाठी मोठा खर्च झाल्याचे समोर आले आहे. ईडीने 39 ठिकाणी छापे टाकून 417 कोटी रुपयांचा अवैध पैसा जप्त केला आहे. त्याच्या विवाह सोहळ्यात सेलिब्रिटींचा मेळावा भरवण्यात आला होता.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांना पैसै देण्यात आले होते असेही ईडिच्या निदर्शनास आल्याने आता हे कलाकार ईडीच्या कचाट्यात सापडले आहे.
मनी लाँड्रिंगमध्ये अडकला महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप
महादेव ऑनलाइन जुगारॲपपच्या प्राथमिक प्रवर्तकांपैकी एक सौरभ चंद्राकर, ॲपपच्या संबंधात कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीच्या चौकशीत आहे. चंद्राकरने यूएईमध्ये आपल्या भव्य लग्नासाठी २०० कोटी रुपये खर्च केल्याचे ईडीने उघड केले. त्यांचे कुटुंबीय नागपूरहून खासगी जेटने लग्नासाठी आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
सेलिब्रिटींचा मेळावा
UAE मध्ये सौरभ चंद्राकरच्या लग्नाला गायक, नर्तक आणि अभिनेते यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अतिथींच्या यादीत आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, एली अवराम, भारती सिंग, सनी लिओन, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नेहा कक्कर, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. या सेलिब्रिटींना लग्नात कार्यक्रम सादर करण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पेमेंटबाबत चौकशीसाठी ईडी त्याला समन्स बजावू शकते, असे मानले जात आहे.