Maharashtra police seize 89 swords from vehicle on Mumbai-Agra highway

सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 89 तलवारी आणि एक खंजिर आढळून आला. वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहन वेगाने पळवल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास गाठले. गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या(Maharashtra police seize 89 swords from vehicle on Mumbai-Agra highway).

    धुळे : सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 89 तलवारी आणि एक खंजिर आढळून आला. वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहन वेगाने पळवल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास गाठले. गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या(Maharashtra police seize 89 swords from vehicle on Mumbai-Agra highway).

    सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींसोबत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम, कपिल विष्णू दाभाडे सर्व राहणार जालना येथील असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी, 90 तलवारीसह 7 लाख 13 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    ही शस्त्रे राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे नेण्यात येणार होती. सर्व चारही आरोपी जालना येथीलच आहेत.

    महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट

    ज्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे त्याठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या आहेत. जालनाला या तलवारी पाठवण्यात येणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगल घडवायची आहे? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत? या प्रकरणाच्या खोलवर तपास केला पाहिजे. ठाकरे सरकार ही चौकशी करणार का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.