मोठी बातमी! श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी- अमित शाह

श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे.

    नवी दिल्ली :  श्रद्धा वालकरच्या (Shraddha Walkar Murder Case)  निर्घृण हत्येप्रकरणी देशभरात सतांपाची लाट आहे. आफताबपासून आपल्या जीवाला धोका असल्याचं श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून सांगितल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या सदंर्भात महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केलं आहे.

    श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी रोज नवी नवी माहिती समोर येत आहे.  श्रद्धाचा रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिल्याचं कोर्टाल सांगितलं होतं. तर दुसरीकडे श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांकडे आफताबची तक्रार केल्याची बाब आता समोर आली आहे. आफताबनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारात नमूद केलं होत. तरीही   श्रद्धानंपोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं की, “श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझं संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल.”

    पालघर पोलिसांत केली होती तक्रार

    पालघर पोलिसांना लिहिलेल्या पत्रात श्रद्धाने आफताबने तिच्यावर होत असलेल्या  अत्याचाराबाबत सांगितले होते. आफताबने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला जीवे मारून तुकडे करून टाकण्याची अशी धमकी दिल्याचही सांगितलं.