
कोची पोलिसांनी (Kochi Police) बुरख्यात महिलेचा वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली.
सुशिक्षित राज्य केरळमधून (Kerala Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोची येथील एका प्रसिद्ध मॅालमध्ये एक युवक महिलांची वेशभूषा करून बुरखा घालून महिलांच्या वॅाशरुममध्ये (man for dressing up as a woman in a burqa) येऊन त्यांचे व्हिडिओ रेकार्डिंग (recording videos from the women’s washroom)करत होता. महिलांच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली. अभिमन्यू असे आरोपीचे नाव असून तो रोबोटिक्स इंजिनीअरिंग पदवीधर असून तो कोची येथे कार्यरत आहे. कोची पोलिसांनी (Kochi Police) त्याला अटक करण्यात केली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी एका प्रसिद्ध मॉलमध्ये ही घटना घडली. आधी त्याने कथितपणे मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये प्रवेश केला, त्याचा फोन एका बॉक्समध्ये ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तो दरवाजाजवळ ठेवला. त्याचे संशयास्पद वर्तन पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याची झडती घेतली असता तो युवक असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याला अटक केली. मुख्य म्हणजे आरोपीचे रोबोटिक्स इंजिनीअरिंग पदवीधर असून तो कोची येथे कार्यरत आहे. त्याच्यावर IPC कलम 354(C) (voyeurism), 419 (तोतयागिरी) आणि IT कायद्याच्या कलम 66E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अभिमन्यूचा फोन आणि बुरखाही जप्त केला. तो यापूर्वी त्याने असाच प्रकार केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.