जोडपे दिवसभर सोबत भटकले, रात्र घालवण्यासाठी लॅाजवर गेले; नंतर घेतल्या शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनाने झाला तरुणाचा मृत्यू!

तरुण तरुणी रात्र घालवण्यासाठी लॅाजवर गेले. यावेळी त्याने शक्तीवर्धक गोळ्यांचं अतिसेवन केल्याने त्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्याता मृत्यू झाला.

  भंडारा : गोळ्यामुंळे शरीराला कितीही आराम मिळत असला तरीही त्याचं अतिसेवन करणं कधीकधी जिवावर बेतू शकंत. असं माहीत असूनही अनेक जण गोळ्याचं अतिसेवन करतात. असचं एक प्रकरण भंडाऱ्यामधून समोर आलं आहे. लॅाजवर मैत्रीसोबत रात्र घालवण्यासाठी गेलेल्या तरुणाने शक्तिवर्धन गोळ्याचं अतिसेवन केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Man Died Due To Viagra Overdose) तरुणाने “वायग्रा” (Viagra) गोळ्यांचं अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब (Blood Pressure) वाढल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.

  नेमंक काय घडलं?

  मृत तरुण 27 वर्षीय असून तो नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील आहे. तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय असून ती गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली. त्यांनतर त्यांच रोज फोनवर बोलणं सुरू झालं. हळूहळू मैत्री झाली आणि  कालांतराने मैत्री प्रेमात बदलली. त्यामुळे दोघांनीही भेटण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही भंडाऱ्यात भेटण्याचं ठरवलं.

  दोघांनी रात्र सोबत घालवण्याचा घेतला निर्णय

  ठरल्याप्रमाणे नागपूर इथून तर तरुणी गोंदियातून भंडाऱ्यात पोहोचले. दोघंही दिवसभर भंडाऱ्यात सोबत फिरले. शॉपिंग केली आणि दोघांना आणखी थोडा वेळ सोबत घालवावा वाटत होता. त्यामुळे त्यांनी रात्र एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी भंडारा मध्यवर्ती बसस्थानका लगत असलेल्या हिरणवार लॉजमध्ये रुम बुक केली.

  वायग्राच्या अतिसेवनाने झाला घात

  दोघंही लॅाजवर जाण्याआधी तरुणाने मेडिकलमधून “वायग्रा” 100 mg शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या तरुणाने चार पैकी दोन गोळ्यांचं म्हणजेच एकाचवेळी 200 mg गोळ्याचं सेवन केलं. गोळ्यांचं अतिसेवन केल्याने तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झाला. तो अस्वस्थ झाल्यने घाबरलेल्या तरुणीने लॅाजवरील मॅनेजरला याबाबत सांगितले. लगेच तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॅाक्टरांनी तरुणाला तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हा वायग्रा शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.