आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलाकडून खून  

भोसरीमधील अल्पवयीन मुलाने त्याच्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून केला. याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

    पिंपरी : भोसरीमधील अल्पवयीन मुलाने त्याच्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून केला. याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
    दीपक वाघमारे (वय 31, रा. भोसरी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यातील  अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. रोहित ससाणे (वय 18 वर्षे) व सुनील जावळे (वय 20 वर्षे) अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही भोसरी येथील रहिवासी आहेत.
    या घटनेची अधिक माहिती देताना भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले, की ”काल त्यांना कंट्रोल रूममधून फोन आला, की अनोळखी इसमाचे मृत शरीर मोहननगरमधील जय गणेश व्हिजन मागील मोकळ्या मैदानात मिळाले आहे. पोलिसांनी मृताच्या खिशातील कागदपत्राच्या मदतीने त्याचा पत्ता मिळाला.
    अधिक तपास केल्यानंतर कळले की त्याचे भोसरीतील एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. त्या महिलेला एक अल्पवयीन मुलगा आहे. त्या मुलाला या अनैतिक संबंधमुळे मनात राग होता. त्याने त्याच्या मित्राबरोबर मिळून दीपकला ठार मारण्याचा कट रचला. त्याने दीपकला सांगितले, की त्याचा मित्रा त्याला पैसे परत करत नाही व दीपकने त्याच्याकडून ते मिळवून द्यावेत. तो मुलगा दीपकला मोहननगर जय गणेश व्हिजन मागील मोकळ्या मैदानात घेऊन गेला. तेथे दीपकच्या गळ्यावर कोयत्याने वार केले व त्याला दगडाने ठेचून ठार मारले.”