नार्को टेस्टमध्ये आफताबकडून अनेक धक्कादायक खुलासे, दोन तास चालली चाचणी

श्रद्धाच्या हत्येच्या वेळी वापरलेली शस्त्र आणि ती कुठं फेकली याचही माहिती त्याने दिली. यापूर्वी आफताबनेही पॉलीग्राफ चाचणीत श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती.

  नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (shrdhha walkar murder case) हत्याप्रकरणाने अवघा देश हादरून गेला आहे. या प्रकरणी नवनवीन खुलासे रोज समोर येत असून यातून हे हत्याकांडाचे गूढ उलकू लागले आहे. आरोपी आफताबच्या पॅालिग्राफ चाचणी नंतर काल त्याची नार्को टेस्ट करण्यात आली.  या नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येच्या कबुलीसह अनेक धक्कादायक खुलासे केले.

  श्रद्धा हत्याकांड प्रकरणाप्रकरणी दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या तज्ज्ञ पथकाकडून आफताबची  नार्को टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये त्याने हत्या केल्याची कबुली दिली. तसेच त्याने श्रद्धाचा मोबाईल कुठं फेकला आणि श्रद्धाचे कपडे कुठे फेकले, याबद्दल उत्तरही दिले.  तसेच श्रद्धाच्या हत्येच्या वेळी वापरलेली शस्त्र आणि ती कुठं फेकली याचही माहिती त्याने दिली. यापूर्वी आफताबनेही पॉलीग्राफ चाचणीत श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती.

   

  दिल्ली पोलिसांनी आफताबला गुरुवारी सकाळी 8.40 वाजता रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले होते, जेथे चाचणीपूर्वी त्याची सामान्य तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजता नार्को चाचणी सुरू झाली आणि सुमारे दोन तासांनंतर ती संपली. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने परीक्षेत विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. संजीव गुप्ता म्हणाले की, नार्को चाचणीवेळी मानसशास्त्रज्ञ, फॉरेन्सिक लॅब रोहिणीचे छायाचित्र तज्ज्ञ आणि आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.

  18 मे ला केली हत्या

  आरोपी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे दिल्ली येथील जंगलात फेकून दिले. ६ महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी तिचे सुुरुवातीला हत्येसोबतच अनेक बाबी समोर आल्या.  आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करत असल्याचीही बाब समोर आली होती. तसेच यापुर्वी तिने मुंबईत आफताब विरोधात तक्रारही केल्याच समोर आलं होतं.