मुंबईत १४०० कोटींचे मेफेड्रोन जप्त; पाच जणांना अटक

जप्त केलेल्या अमलीपदार्थाचे वजन ७०० किलोपेक्षा जास्त असून मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. एका औषध कंपनीवर टाकलेल्या छाप्यात सदर अमलीपदार्थ पकडण्यात आला असून मेफेड्रोन हे प्रतिबंधित औषध तयार केले जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या छापेमारीत मुंबईतील चार आणि नालासोपारा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमलीपदार्थविरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) नालासोपारा परिसरातून ७०३ किलो एमडी ड्रग्ज जप्त (MD Drug Seized) केले. जप्त ड्रग्जचे बाजारमूल्य सुमारे १४०० कोटी रुपये असून पोलिसांना याप्रकरणी पाच तस्करांना अटक केली आहे, अशी माहिती अमलीपदार्थविरोधी सेलचे डीसीपी दत्ता नलावडे (DCP Datta Nalawde) यांनी दिली.

    डीसीपी नलावडे यांनी सांगितले की, जप्त केलेल्या अमलीपदार्थाचे वजन ७०० किलोपेक्षा जास्त असून मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. एका औषध कंपनीवर टाकलेल्या छाप्यात सदर अमलीपदार्थ पकडण्यात आला असून मेफेड्रोन (Mephedrone) हे प्रतिबंधित औषध तयार केले जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या छापेमारीत मुंबईतील चार आणि नालासोपारा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

    मुंबईत पोलिसांनी पकडलेल्या अमलीपदार्थविरोधातील ही एक मोठी कारवाई आहे. मेफेड्रोन हे ड्रग्ज ‘म्याव म्याऊ’ किंवा एमडी (MD) म्हणून देखील ओळखले जाते. ही एक कृत्रिम पावडर असून नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यानुसार हे प्रतिबंधित अमली पदार्थ मानले जाते.