
त्याचं नाव कार्लोस असून तो शहरातील मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने लोकांना घाबरवण्यासाठी त्याने बाहुली चेहऱ्यावर ठेवली होती. हा गुन्हा असून, त्यामुळेच आरोपी आणि त्याच्या बाहुल्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तुम्ही झपाटलेला चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्यातला बोलणार बाहुला तात्या विंचू चांगला लक्षात असेल. त्या बाहुल्याची एवढी दहशत निर्माण झाली होती की चित्रपट पाहतानाही आपल्याला धडकी भरत होती. मात्र, मेस्किोमध्ये अशाच एका बाहुल्याला पोलिसांनी अटक केल्याचा एक विचित्र प्रकार घडला आहे. या बाहुलीला सैतानी बाहुली म्हणून ओळखलं जात होतं. लोकांना घाबरवण्यासाठी या बाहुलीच्या हातात खरा चाकू दिला जात होता. यासोबत हा सगळा खेळ रचणाऱ्या बाहुलीच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
नेमका प्रकार काय?
मेक्सिकोमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी एका बाहुलीला अटक केली आहे. या बाहुलीला पाहून लोकं भीत होते. ही एक भितीदायक बाहुली आहे, जिचे नाव चकी आहे. तिच्या मालकाने लोकांना घाबरवण्यासाठी चकीचा वापर केला.
लोकांकडून पैसै उकळ्यासाठी बाहुलीचा वापर
अमेरिकन मीडियानुसार, पोलिसांनी बाहुलीला अटक करण्यासोबतच तिच्या मालकालाही पकडले आहे. ही बाहुली डेव्हिल डॉल म्हणून ओळखली जाते. लोकांना घाबरवण्यासाठी त्याच्या हातात खरा चाकू दिला जातो. चकी आणि त्याच्या मालकावर 11 सप्टेंबर रोजी उत्तर मेक्सिकोमधील कोहुइला राज्यातील मोनक्लोव्हा शहरात लोकांना दहशत माजवल्याचा आरोप आहे. बाहुलीच्या मालकाने या बाहुलीचा वापर याआधी लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी केला आहे.
त्याचं नाव कार्लोस असून तो शहरातील मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने लोकांना घाबरवण्यासाठी त्याने बाहुली चेहऱ्यावर ठेवली होती. हा गुन्हा असून, त्यामुळेच आरोपी आणि त्याच्या बाहुल्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.