
रायरंगपूरचे भाजप आमदार नव चरण मांझी यांच्या सरकारी निवासस्थानातून एका अल्पवयीन मुलीचा पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला आहे. मृत तरुणी ही आमदाराच्या मोठ्या भावाची मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ओडिशातील (Odisha) रायरंगपूर येथील भाजप आमदारांच्या निवासस्थानातून एका अल्पवयीन मुलीचा छताला पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला (girl deadbody fiound in mla house) आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मुलगी या आमदाराच्या मोठ्या भावाची मुलगी असून तो गेल्या एक महिन्यापासून येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे.
नेमका काय प्रकार
रायरंगपूरचे भाजप आमदार नव चरण मांझी यांच्या सरकारी निवासस्थानातून एका अल्पवयीन मुलीचा पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला आहे. मृत तरुणी ही आमदाराच्या मोठ्या भावाची मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरबेल नगर पोलीस तपास करत आहेत.
मुलगी बारावीची विद्यार्थिनी
रायरंगपूर येथील भाजप आमदार नवचरण माळी हे आमदार कॉलनीतील डीएस 10/1 क्वॉर्टरमध्ये राहतात. आमदाराची भाची महिनाभरापासून येथे राहत होती. ती नयापल्ली येथील एका महाविद्यालयात १२ वीची विद्यार्थिनी आहे. शनिवारी रात्री 10 वाजता ती तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. रविवार असल्याने ती उशिरा उठेल या विचाराने घरच्यांनी तिला उठवले नाही. मात्र, बराच वेळ दार वाजवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांना संशय आला.
खिडकीतून दिसला लटकलेला पंख्याला लटकलेला मृतदेह
यानंतर कुटुंबीयांनी खिडकीतून खोलीत पाहिले असता मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. खरवलेनगर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
त्यात त्याच्याबद्दल बरीच महत्त्वाची माहिती असल्याचे दिसते. या प्रकरणी आता पोलीस तिच्याबाबत कुटुंबियांसोबत बोलत असून, ती मुलगी झोपण्यापूर्वी कोणाशी बोलत होती का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तिला कुठल्या प्रकरच्या अडचणीत होती का याचा तपास करत आहेत. मात्र. तिच्या मृत्यूबाबत परिसरातील लोक विविध प्रकारच्या चर्चा करताना दिस आहेत.