मुलीचं नेहमी पोट दुखायचं, डॅाक्टरांकडून सत्य कळल्यावर आई-वडिलांच्या पायखालची जमीन सरकली!

मुलीला रुग्णालयात भरती केल्यानंतर तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या दरम्यान ती गरोदर असल्याची बाब समोर आली.

    नवी मुंबईत एका परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीची तब्येत काही दिवसापासून बिघडली होती. ती सतत पोट दुखण्याची तक्रार करत होती, तिला नेहमी उलट्या होत होत्या. तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथे डॅाक्टरांनी तिची तपासणी केल्यावर ती मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मुलीसह तिच्या आई-वडिलांनाही धक्का बसला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया.

    नेमका प्रकार काय

    मिळालेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षीय मुलीला घेऊन तिचे आई वडील गोवंडी परिसरातील एका डॅाक्टरकडे आले होते. मुलगी नेहमी पोटदुखी आणि उलट्या होण्याची तक्रार करत होती. डॅाक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्या. ज्यामध्ये ती मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं. याबाबत मुलीला विचारलं असता या सगळ्या प्रकराला तिचा सख्खा मामा कारणीभूत असल्याचं तिनं सांगितलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नेरुळ इथं राहणारा मुलीचा सख्खा मामा नेहमी भाचीच्या घरी जात होता. 4 ऑक्टोबरला त्याने घरात आपल्या भाचीवर अत्याचार केला आणि कठही याबाबत वाच्यता न करण्यास सांगितले. मुलीनही तिच्यासोबत घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसानंतर पोटं दुखत असल्याने डॅाक्टरांकडे गेल्यावर सत्य समोर आलं. मुलीनं मामाच्या घृणास्पद कृत्याबद्दला कुटुंबियांला सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

    पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मामावर आयपीसी (IPC) आणि लहान मुलीाचं संरक्षण कायदा (POCSO) नुसार गुन्हा दाखल केला असून नराधम मामाला अटक केली आहे. पुढिल कारवाई पोलीस करत आहेत.