आमदार रत्नाकर गुट्टेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; ३५ समर्थकांनी महिलेच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप

गंगाखेड विधानसभेचे रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर एका महिलेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या इतर ३५ समर्थकांनी महिलेच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर आमदारांच्या समर्थकांनी महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे(MLA Ratnakar Gutte charged with molestation).

    परभणी : गंगाखेड विधानसभेचे रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर एका महिलेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या इतर ३५ समर्थकांनी महिलेच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर आमदारांच्या समर्थकांनी महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे(MLA Ratnakar Gutte charged with molestation).

    या संदर्भात महिलेच्या तक्रारी वरून गंगाखेड पोलिसात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे सहित इतर ३५ जणांविरिद्ध मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आहे. ३५४ (ब) ३२४, १८४, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ आणि १३५ बी.पी.अॕक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यावर प्रतिक्रिया देताना डॉ.गुट्टे यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे, जी शेत जमीन अस्तित्वातच नाही आणि अशी काही घटना घडलीच नाही, जो काही प्रकार झाला आहे त्याचे सर्व व्हिडीओ त्यांनी स्वतः पोलीसांना दिले आहे.