मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणात एका कालव्यात सापडला, पाठीवर असलेल्या टॅटूवरून बहीणने ओळख पटवली!

2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना कालव्यात मॉडेल दिव्याचा मृतदेह सापडला आहे.

  वर्षाच्या सुरुवातीस सायबर सिटी गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या (Model  Divya Pahuja Murder Case) करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना कालव्यात मॉडेल दिव्याचा मृतदेह सापडला आहे. तिची बहीण नैना हिने मृतदेहाची ओळख पटवली आहे.

  गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफ टीम पतियाळा ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात दिव्या पाहुजाच्या मृतदेहाचा शोध घेत होती, मात्र तिचा मृतदेह तोहाना कालव्यात सापडला. दिव्या पाहुजाची बहीण नयना पाहुजा हिने तिच्या पाठीवर असलेल्या टॅटूवरून मृतदेह ओळखला आहे. गुरुग्राम पोलिसांचे डीसीपी क्राइम विजय कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.दिव्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची २५ सदस्यीय टीम पटियालाला गेली होती. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती, मात्र हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहानाच्या कुडानी हेडमध्ये दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला. याआधी, मुख्य आरोपी अभिजीतचा सहकारी बलराज गिल याला गुरुवारी पश्चिम बंगाल विमानतळावरून अटक करण्यात आली होती. बलराज गिल हा देश सोडून बँकॉकला जाण्याचा विचार करत होता.

  2 जानेवारी रोजी दिव्याची झाली हत्या

  2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंगने दिव्या पाहुजाची हत्या केल्यानंतर आरोपी अभिजीतसह हेमराज आणि हॉटेलमध्ये सफाई आणि रिसेप्शन कामगार म्हणून काम करणारे ओम प्रकाश यांनी तिचा मृतदेह त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला होता.हे काम करण्यासाठी आरोपींनी दोन्ही कर्मचाऱ्यांना सुमारे 10 लाख रुपयांचे आमिष दाखवले होते. यानंतर आरोपी अभिजीतने त्याचे अन्य दोन साथीदार बलराज गिल आणि रवी बंगा यांना बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडी दिली.

  कोण होती मॉडेल दिव्या?

  गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा हिने मॉडेलिंगचे काम करत होती. ती गुरुग्राममधील गडौली गावात राहणाऱ्या गँगस्टर संदीप गडौलीची कथित मैत्रीण होती. 2016 मध्ये मुंबईत गुरुग्राम पोलिसांनी संदीप गडोलीचा एनकाऊंटर केला होता. मात्र, या चकमकीला बनावट असल्याचे सांगून दिव्या पाहुजा आणि संदीप गडोली यांच्या आईने गुरुग्राम पोलिसांच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध संदीपच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता.