३०० पेक्षा अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ

थायलंडमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्याचसोबत इतर देशातले काही नागरिकही असून या भारतीयांमध्ये ६० जण तामिळनाडूमधील आहेत. ओलीस ठेवलेल्या या लोकांकडून भारत सरकारकडे आपल्याला सुखरुप सोडवण्यासाठीच्या याचना केल्या जात आहे.

    बँकॉक : थायलंडमध्ये (Thailand) ३०० हून अधिक भारतीय (Indian) नागरिकांना ओलीस (Hostage) ठेवल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. या नागरिकांकडून सायबर गुन्हे (Cyber Crime) करवून घेतले जात आहेत. त्यांनी हे गुन्हे करण्यास नकार दिल्यास त्यांचा अमानुष छळ (Inhuman Torture) केल्याचीही माहिती मिळाली आहे.

    थायलंडमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्याचसोबत इतर देशातले काही नागरिकही असून या भारतीयांमध्ये ६० जण तामिळनाडूमधील आहेत. ओलीस ठेवलेल्या या लोकांकडून भारत सरकारकडे आपल्याला सुखरुप सोडवण्यासाठीच्या याचना केल्या जात आहे. तसेच, काही भारतीयांना म्यानमारच्या म्यावाडी येथे हलवण्यात आले आहे. सदर लोकांचा तिथे नेऊन छळ केला जात आहे. काम करण्यास नकार देणाऱ्यांना शॉक देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.