पतिच्या दारुच्या व्यसनामुळे संसाराची वाताहत, संतापलेल्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; 8 महिन्यांच्या चिमुकल्याला दिली भयंकर शिक्षा!

महिलेने 6 दिवसांपूर्वी आपल्या 8 महिन्यांच्या मुलाची हत्या केली होती. तेव्हापासून ती फरार होती. आता तिला अटक करण्यात आली आहे.

    आजकाल क्षुल्लक कारणावरुन पतिपत्नीमध्ये होणारं भांडण गंभीर होत गुन्ह्याचं स्वरुप घेताना दिसत आहे. छत्तीसगडच्या अंबिकापूरमधून एक हृदय हेलावणारी बातमी आली आहे. पतिच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्निनं त्याला  ‘दारू सोडली नाही तर मुलाला मारून आत्महत्या करेन’, अशी धमकी दिली होती. तरीही त्याने दारु न सोडल्याने महिलेने त्याची शिक्षा तिच्या 8 महिन्याच्या चिमुकल्याला दिली. तिने रागाच्या भरात तिच्या 8 महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्याची  चाकूने वार करून हत्या (Mother Killed Her Son) केली.  पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.

    नेमका प्रकार काय

    26 जानेवारी रोजी पोलिसांना 8 महिन्यांच्या चिमुरड्याचा कोणीतरी खून केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता महिलेचा एका महिलेचा पती पवन चौहान याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे त्यांना आढळून आले. दारू पिण्यावरून तो दररोज पत्नीशी भांडत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारीच्या रात्री पती दारू पिऊन घरी पोहोचला तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर तिने 8 महिन्यांच्या बाळाच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर ती पळून गेली.

    पत्नीने पतीला आधीच धमकी दिली होती

    पतीच्या दारु पिण्यावरन यापुर्वीही त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी तिने मुलाला मारून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. घटनेच्या दिवशी तिने त्याला पुन्हा एकदा धमकी दिली, मात्र दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. सकाळी पतीला जाग आली तेव्हा समोर आठ महिन्यांच्या चिमुरड्याचा मृतदेह पडल्याचे सांगितले जाते. तर पत्नी घरी नव्हती. ती फरार झाली होती. यानंतर घरात आरडाओरडा झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तपासाअंती त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.