प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नांदेड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या पोटच्या दोन लेकरांची हत्या केली. आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंगावर काटा आणणारी ही घटना भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी मातेसह दोघांना ताब्यात घेतल आहे(Mother kills children).

    नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या पोटच्या दोन लेकरांची हत्या केली. आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंगावर काटा आणणारी ही घटना भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी मातेसह दोघांना ताब्यात घेतल आहे(Mother kills children).

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात बुधवारी रात्री एका आईने दोन वर्षाच्या मुलासह चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या आईची आणि भावाची मदत घेतली. तिघांनी मिळून दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून टाकले.

    धुरपतबाई निमलवाड असं हत्या करणाऱ्या आईचे नाव आहे, दत्ता आणि अनुसया असे खून झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. धुरपतबाईला तीची आई कोंडाबाई राजेमोड, भाऊ माधव राजेमोड यांनी चिमुकल्यांचे मृतदेह जाळण्यास मदत केली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    धुरपतबाई हीच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आईसह तिघांविरोधात भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.