
पिंपळे सौदागर येथे मोटरसायकलवरून ट्रिपल सीट आलेल्या मुलांनी पिंपळे सौदागरमध्ये पादचारी महिलेचे 1.20 लाख रुपयांचे सोन्याचे गंठण चोरले. ही घटना 18 जून रोजी घडली.
पिंपरी : पिंपळे सौदागर येथे मोटरसायकलवरून ट्रिपल सीट आलेल्या मुलांनी पिंपळे सौदागरमध्ये पादचारी महिलेचे 1.20 लाख रुपयांचे सोन्याचे गंठण चोरले. ही घटना 18 जून रोजी घडली.
फिर्यादी महिला 18 जून रोजी संध्याकाळी 5.50 वा महादेव मंदिराजवळ पायी चालत जात असताना ही घटना घडली. याबाबत त्या महिलेने अनोळखी तीन इसमांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर भा. द. वि. 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला पायी जात असताना एक पांढऱ्या रंगाच्या मोपेड मोटरसायकलवरून तीन मुले महादेव मंदिराच्या बाजूने ट्रिपल सीट आली. त्या मुलांपैकीमध्ये मध्ये बसलेल्या मुलाने फिर्यादी यांच्या गळ्यातील अडीच तोळे वाजनाचे सोन्याचे गंठण ओढून नेले.