Shocking! बनावट पासपोर्ट आणि व्हिसा बनवणारी टोळी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात, दोन जण ताब्यात, दहशतवादी कनेक्शनच्या दृष्टीने तपास सुरू

अनेक देशांचे बनावट पासपोर्ट आणि बनावट व्हिसा बनवणाऱ्या टोळीचा बुधवारी मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पर्दाफाश केला. या टोळीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, याचाही तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

    मुंबई. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ( Mumbai) येथील अंधेरी परिसरात (Andheri Area) बुधवारी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) बनावट पासपोर्ट आणि बनावट व्हिसा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

    पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छाप्यात अनेक देशांचे बनावट स्टॅम्प, बँकांचे तपशीलवार स्टेटमेंट, बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यात टोळीतील २ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या टोळीचा दहशतवादी संघटनांशी काय संबंध आहे याचाही तपास केला जाणार आहे.

    डीसीपी प्रशांत कदम (DCP Prashant Kadam) यांनी सांगितले की, मुंबई क्राइम ब्रँचने बुधवारी अंधेरीतील एका फ्लॅटवर छापा टाकला. येथून २८ जणांचे पासपोर्ट (Passport) सापडले असून इतर अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये मशीन, संगणक, प्रिंटर, शाई, डॉक्टरांचे शिक्के, विविध देशांच्या व्हिसाची बँक प्रत जप्त करण्यात आली. या टोळीतील एजंटांचीही चौकशी सुरू आहे. या टोळीद्वारे बनावट पासपोर्टवर किती लोक देशाबाहेर गेले आहेत आणि ते लोक कोण आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.

    १ ते ५ लाखांपर्यंत बनावट कागदपत्रे बनवायची

    या टोळीत अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पकडले गेलेले दोघे जण यापूर्वी अशाच प्रकारच्या बनावटगिरीत पकडले गेले होते. बनावट पासपोर्ट वापरल्याप्रकरणी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता, हे लोक बनावट कागदपत्रे तयार करून बनावट व्हिसा-पासपोर्ट आदी १ ते ५ लाख रुपये घेऊन देत असल्याची माहिती मिळाली. या टोळीने युएई, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, मालदीव, कॅनडा, इस्तंबूल, फ्रान्स आदी देशांतील लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध करून दिला होता, असे मुंबई गुन्हे शाखेने सांगितले.