mumbai crime news husband murder his wife in virar police took one person into custody nrvb

पीडितेचा मृतदेह ३० जानेवारी रोजी विरार शंकर पाडा येथील दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

    विरार : विरार पोलीस ठाण्याच्या (Virar Police Station) हद्दीत एका व्यक्तीने आपल्या २७ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी शवविच्छेदन अहवालानंतर (Postmortem Report) पती वैभव पाटील (Husband Vaibhav Patil) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचा पती अद्याप फरार आहे.

    ते म्हणाले की, पीडितेचा मृतदेह ३० जानेवारी रोजी विरार शंकर पाडा येथील दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

    आरोपी पती अद्याप फरार

    मृत्यूचे कारण उघड झाल्यानंतर महिलेच्या पती (३०) विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. हत्येचे कारण शोधले जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी पती अद्याप फरार आहे. फरार पतीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आरोपी पती वैभव पाटील याला लवकरच अटक करण्यात येणार असून पत्नीच्या हत्येमागील नेमकी माहिती समोर येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.