गोव्याला सुट्टीवर गेलेल्या मुंबईतील तरुणीवर बलात्कार, आरोपी बस चालकाला अटक

रुणीच्या तक्रारीनंतर रविवारी गोवा पोलिसांच्या महिला शाखेने त्याला अटक केली.

    मुंबई: गोव्याला सुट्टीसाठी गेलेल्या मुंबईतील एका तरुणीवर बस चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बस चालकाचा अटक करण्यात आली आहे. शनिवारी ही घटना आरोपीच्याच बसमध्ये घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..

     

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून काही मित्र-मैत्रींणीचा ग्रुप फिरण्यासाठी गोव्याला गेला होता. यामध्ये एकूण 14 समावेश आहे. त्यांनी गोव्यात फिरण्यासाठी आरोपीची बस भाड्याने घेतली होती. दरम्यान, शनिवारी आरोपीची एका युवतीवर अत्याचार केला. तरुणीच्या तक्रारीनंतर रविवारी गोवा पोलिसांच्या महिला शाखेने त्याला अटक केली. ‘आरोपी हा वास्कोच्या जुआरीनगरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.