
मुंबई पोलीस गु्न्हे शाखा युनिट 10 ला गोरेगाव पश्चिम येथे एका घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई करत गोरेगाव परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. दोन महिलेसह एक युवक हे सेक्स रॅकेट चालवत होते. या कारवाई दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकाला अटक केली असून 16 वर्षीय मुलीची सुटका केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोरेगावमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट
मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, गोरेगाव परिसरातील एक ईमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. मुंबई पोलीस गु्न्हे शाखा युनिट 10 ला गोरेगाव पश्चिम येथील एका घरावर छापा मारला. यावेळी अरूणा संतोष सिंग (64 वर्ष), रेश्मा फरीद शेख (30 वर्ष) आणि रिझवान नसीर सय्यद (31 वर्ष) हे तिघे हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात आढळून आले. या कारवाईदरम्यान एक 16 वर्षीय मुलगी आणि एका महिलेची सुटका केली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी रिझवानला अटक केली केली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईत यापुर्वीदेखील पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मात्र, गोरेगाव मधील निवासी परिसरातील इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे