हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या; रुममधील क्षुल्लक वादातून गोळीबार

आरोपी प्रवीण मंगळवारी आपल्या प्रेयसीसोबत ओयो हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी हॉटेल रुममध्येच त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपीने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या छातीत गोळी झाडली. प्रेयसीचा खून केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेलच्या आवारात खळबळ उडाली.

    नवी दिल्ली – दिल्लीतील नरेला परिसरातील एका हॉटेलमध्ये ३८ वर्षीय विवाहित व्यक्तीने आपल्या प्रेयसीची गोळी (Girl Friend Murder) घालून हत्या केली. या प्रकारानंतर आरोपीने (Accused) स्वत:वरही गोळी (Firing) झाडून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. मात्र, त्याचा जीव वाचला आहे. प्रवीण उर्फ सितू असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर राजीव गांधी रुग्णालयात (Rajeev Gandhi Hospital) उपचार सुरू आहेत.

    आरोपी प्रवीण मंगळवारी आपल्या प्रेयसीसोबत ओयो हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी हॉटेल रुममध्येच त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपीने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या छातीत गोळी झाडली. प्रेयसीचा खून केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेलच्या आवारात खळबळ उडाली.

    हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गीता असे ३९ वर्षीय मृत प्रेयसीचे नाव आहे. आरोपी प्रियकराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. विशेष म्हणजे २१ सप्टेंबर रोजी आरोपीवर आणखी एका खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.