पाच कोटींसाठी चंद्रशेखर गुरुजींची हत्या; धक्कादायक सत्य उघड

अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजींचा खून केल्याचे उघड झाले आहे.

    बेंगळुरू : सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या हत्या (Murder) प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum) रामदुर्ग येथून अटक करण्यात आली असून महांतेश आणि मंजुनाथ अशी त्यांची नावे आहेत.

    सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमागे पाच कोटींची मालमत्ता (Property) विकल्याचा विषय कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता (Anonymous Property) विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजींचा खून केल्याचे उघड झाले आहे.

    चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्याने केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड या सहकार्याच्या मदतीने त्यांची हत्या केली. चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. चंद्रशेखर अंगडी बागलकोट जिल्ह्यातले असून त्यांनी सरल वास्तू (Saral Vastu) या संस्थेची स्थापना केली होती. तसेच, त्यांचे सरल जीवन नावाचे एक चॅनल होते. कन्नड आणि मराठी टीव्ही चॅनलवर (Marathi TV Channel) त्यांचा कार्यक्रम रोज येतो.