दिल्लीच्या पालममध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या; आरोपीला अटक

दिल्लीच्या पालम भागात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजीचा समावेश आहे. या कुटुंबियांचे मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी आढळून आले आहेत. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीनेच त्याचे कुटुंब संपवल्याचे समोर आले आहे.

    नवी दिल्ली – दिल्लीच्या पालम (Palam) भागात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या (Family Members Murder) करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजीचा समावेश आहे. या कुटुंबियांचे मृतदेह (Death Bodies) पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी आढळून आले आहेत.

    अमली पदार्थांच्या (Acidic Substance) आहारी गेलेल्या व्यक्तीनेच त्याचे कुटुंब संपवल्याचे समोर आले आहे. या आरोपीला पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.