अलिबागमध्ये विवाहित प्रेयसीची हत्या; जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्यात सदर महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. यावरून संशयित आरोपी सचिन थळे याच्या चौकशीत त्याने पूनम हिची हत्या केल्याचे कबूल केले. मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यातूनच त्याने तिला मुरुडला आणून ठार मारले.

    अलिबाग : प्रियकराने विवाहित प्रेयसीची (Married Lover) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर प्रियकराने प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट (Destroy Evidence) करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रायगड (Raigad) जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रियकराला बेड्या (Lover Arrest) ठोकण्यात आल्या आहेत.

    अलिबाग तालुक्यातील नवखार (Alibaug) येथे राहणारी विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती. यामुळे, मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुरुवारी सकाळी मुरूड तालुक्यातील गारंबीच्या जंगलालगत रस्त्याच्या कडेला झुडपात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता.

    रायगड पोलिसांना श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला. यावेळी या मृतदेहाच्या अंगावर लाकडाचे ओंडके ठेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्यात सदर महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. यावरून संशयित आरोपी सचिन थळे याच्या चौकशीत त्याने पूनम हिची हत्या केल्याचे कबूल केले. मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यातूनच त्याने तिला मुरुडला आणून ठार मारले.