नाशिकमध्ये मुस्लीम धर्मगुरूची सुफीबाबा हत्या; अफगाणिस्तानशी संबंध

अफगाण नागरिक असलेला सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३६) (Sufi Khwaja Syed Jarib Chisti) या युवकास गोळी झाडून ठार केल्याचे दिसून आले. तसेच, चार अनोळखी व्यक्ती गाडी घेऊन पळून गेल्याचे समजले. रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण (Nashik District Police) पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनीदेखील तातडीने घटनास्थळी भेटून पाहणी केली.

    नाशिक : चिचोंडी औद्योगिक (Chichondi MIDC) परिसरात काल मंगळवारी सायंकाळी अफगाण तरुणाची गोळ्या (Murder) झाडून हत्या (Murder Of Afgan Young)  केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चार हल्लेखोर गाडी घेऊन पळून गेले. रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅब (Forensic Lab) तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हत्या झालेल्या युवकाबरोबर असलेले त्याचे मित्र गफार आणि आणखी एक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवार (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलीसपाटील वनिता सोमनाथ मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली. पोलीस चौकशीत अफगाण नागरिक असलेला सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३६) (Sufi Khwaja Syed Jarib Chisti) या युवकास गोळी झाडून ठार केल्याचे दिसून आले. तसेच, चार अनोळखी व्यक्ती गाडी घेऊन पळून गेल्याचे समजले. रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण (Nashik District Police) पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनीदेखील तातडीने घटनास्थळी भेटून पाहणी केली.

    रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी येथील एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी सापडली. पूजेचा प्रकार कशासाठी करण्यात आला होता? या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान खून झालेल्या व्यक्ती सोबत असलेले दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच, सदर व्यक्तीचे यू-ट्यूबला हजारो फॉलोवर्स (227.k) आहेत. त्यांची सुफीबाबा (Sufibaba) म्हणून ओळख आहे.