खुनी आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; उद्या होणार सुनावणी

आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र पोलीस आफताबबद्दल अजून काही ठोस पुरावे हाती लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आफताबच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय घेत हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

    नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणाने अवघा देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब याने श्रद्धाचा खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून हे प्रकरण वेगवेगळे वळणं घेत आहे. अशातच सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

    गुरुवारी १५ डिसेंबर रोजी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walker Murder Case) दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठं यश मिळालं होत. मेहरौलीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचे डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाले आहेत. या प्रकरणात प्रत्यक्ष पुरावा सापडल्यानं दिल्ली पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र पोलीस आफताबबद्दल अजून काही ठोस पुरावे हाती लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आफताबच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय घेत हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.