सासरी आलेल्या जावयाने केलं असं काही, मेहुणीला झाला संताप अनावर, आधी लिहिली चिठ्ठी नंतर केली आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली असून त्यात तिने आपल्या भाऊजींना कारण सांगितले आहे. घटनेपासून आरोपी मेव्हणा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृताच्या बहिणीसोबत प्रेमविवाहही केला होता.

    नालंदा : भाऊजी-मेहुणीचं नाते (Brother-sister-in-law relationship) सहसा गंमतीशीर असते, पण बिहारमध्ये (Bihar) एक घटना समोर आली आहे, जिथे भाऊजीच्या नात्यामुळे मेहुणीने आपला जीव दिला आणि आत्महत्या (Suicide) केली. ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यात (Nalanda District) घडली आहे, पीडिता तिच्या भाऊजींना कंटाळली होती आणि मृत्यूला कवटाळण्याआधी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती (Write A Suicide Note) ज्यामध्ये भाऊजींचा हात आहे.

    ही घटना नालंदा जिल्ह्यातील करयापरशुराई पोलीस ठाण्याच्या (Karyaparshurai Police Station) हद्दीतील बर्थू गावातील आहे. भाऊजींच्या चुकीच्या कृत्याला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेबाबत सांगण्यात येत आहे की, करयापरशुराई पोलीस स्टेशन हद्दीतील बर्थू गावातील रहिवासी असलेल्या ब्रिजेश कुमार यांच्या मोठ्या मुलीचा काही वर्षांपूर्वी त्यांच्याच गावातील राजबलम प्रसाद यांचा मुलगा नीलमणी कुमारसोबत प्रेमविवाह झाला होता. यादरम्यान मेहुणा नीलमणी कुमार सासरच्या घरी जाऊ लागला. दरम्यान, त्याचे त्याच्या मेहुणीवरही प्रेम होते.

    अनैतिक संबंधाचे प्रकरणही समोर आले

    यादरम्यान मेव्हणा नीलमणी कुमार सासरच्या घरी येऊ लागला आणि याचदरम्यान तो त्याची मेहुणी अंशु कुमारी हिच्या संपर्कात आला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शारीरिक संबंध ठेवले. भाऊजींनी सापळा रचून मेहुणीशी संबंध बनवण्याचा व्हिडीओ बनवला आणि नेहमी चुकीचे काम करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करू लागला. भाऊजींच्या अशा सततच्या चुकीच्या कृत्यांमुळे मानसिक त्रासाला कंटाळून अंशू कुमारीने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला सुरू

    घटनेची माहिती मिळताच करईपरशुराई पोलीस ठाण्याचे अध्यक्ष दीपक कुमार घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान मयत मुलीकडून सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये तिने माझ्या मृत्यूचे कारण माझे भाऊजी असून तिच्या मृत्यूला तिचे भाऊजीच जबाबदार असल्याचे लिहिले असल्याचे तिने सांगितले. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटल बिहार शरीफ येथे पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.