narcotics cells big operation at bhandup airoli naka 2 persons arrested with 266 kg of ganja nrvb

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने भांडुप ऐरोली नाक्यावर २६६ किलो गांजासह २ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ एसएक्स ४ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत ज्यात गांजाची वाहतूक केली जात होती.

    दिघा : मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने (Bandra Unit) भांडुप पूर्व (Bhandup East) परिसरातील भांडुप ऐरोली नाक्यावरून (Bhandup Airoli Naka) २ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे (2 Drug Smugglers Have Been Arrested). मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने भांडुप ऐरोली नाक्यावर २६६ किलो गांजासह (266 KG Ganja) २ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ एसएक्स ४ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत ज्यात गांजाची वाहतूक केली जात होती.

    जप्त करण्यात आलेल्या औषधांची व इतर वस्तूंची किंमत ८२ लाखांहून अधिक आहे, सध्या ती कुठे नेली जात होती आणि ती कोणी मागवली होती, याचा तपास सुरू आहे. या अंमली पदार्थ तस्करांकडून ६६ लाख ५० हजाराचा गांजा आणि १६ लाख किमतीची ४ वाहने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.