दिनेशकुमार बागुल (Dinesh Kumar Bagul) असे लाचखाेर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. आदिवासी विकास विभाग भ्रष्टाचाराने नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. या अगाेदर काेट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचारावरून शासनाने चाैकशी समितीही नेमली हाेती.
नाशिक : आदिवासी विकास विभागातील (Tribal Development Department) सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) कार्यकारी अभियंत्याला (Executive Engineer) २८ लाख ८० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांच्या निवासस्थानी रंगेहात अटक केली (The ACB arrested him red-handed at his residence while accepting a bribe of Rs.28 lakhs 80 thousand).या वृत्ताने आदिवासी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दिनेशकुमार बागुल (Dinesh Kumar Bagul) असे लाचखाेर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. आदिवासी विकास विभाग भ्रष्टाचाराने नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. या अगाेदर काेट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचारावरून शासनाने चाैकशी समितीही नेमली हाेती.
लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासणे (SP Sunil Kadasane, ACB) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे बागुल यांना उंटवाडी नजीक असलेल्या नयनतारा येथील त्यांच्या निवासस्थानी पथकाने ही कारवाई केली.
शासनाच्या मध्यान्ह भाेजन (सेंट्रल किचन) याेजनेचे बांधकाम करायचे हाेते. २ काेटी ४० लाख रूपयांच्या कामाचा कार्यादेश देण्यासाठी बागुल याने माेठ्या प्रमाणात लाचेची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती ही रक्कम २८ लाख ८० हजार रूपये ठरली.संबंधित ठेकेदाराने या बाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता या विभागाने सापला लावून त्याला आज सायंकाळी रंगेहात पकडले.