unknown-persons-break-the-glass-nashik-crime

बुधवार दि. १८ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके (Krishna Bodke) यांनी मंगळवारी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीची टियागो (Tiago) शोरूम गाडी विकत घेतली होती.

    पंचवटी : सातपूर कॉलनी (Satpur Colony) परिसरातील जिजामाता मनपा शाळा (Jijamata Municipal School) आणि मैदान परिसरातील रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग (Parking) केलेल्या जवळपास सात चारचाकी वाहनांच्या काचा अज्ञात टवाळखोरांनी (Unknown Persons Break The Glass) फोडत आपली दहशत (Terror) निर्माण करण्याची घटना समोर आली आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. १८ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके (Krishna Bodke) यांनी मंगळवारी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीची टियागो (Tiago) शोरूम गाडी विकत घेतली होती त्याच्याच दुसऱ्या चारचाकी कारसह जीवन जाधव, भगवान मोगल आणि इतर नागरिकांच्या हुदाई इऑन (एमएच १५ डीएम १४६५), टाटा एस (एमएच १५ एफव्ही २९७१), अल्टो (एमएच १४ बीएक्स ४०५१), (एमएच १५ बिडी १६०२), टाटा टियागो (एमएच १५ जीएल ३१३९) अशा एकूण सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

    विशेष म्हणजेच ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस फोडून अजून महिना झाला नाही तर ही दुसरी घटना सातपूर परिसरात घडल्याने सातपूर व सातपूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संशयित टवाळखोर समाजकंटकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.

    परिसरात, मनपाच्या मोकळ्या मैदानावर टवाळखोर रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा व दहशत निर्माण करत उभे असतात अशा टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी पोलीस आयुक्त व सातपूर पोलिस प्रशासनाकडे केली आहे.