धक्कादायक! मनपा पालिका आयुक्तांनंतर खाकी वर्दीही गंडली; आता पोलीस निरीक्षकाच्या नावाने पैशांची मागणी

सायबर सिटी (Cyber City) म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात (Navi Mumbai City) सदर प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे. सायबर गुन्हेगारांच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे (Online Transsations) सामान्य नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे (Common citizens money is being cheated).

    कोपरखैरणे : सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) चक्क पोलीस निरीक्षकाच्या (Police Inspector) नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट (Instagram Account) सुरू करून पैशांची मागणी (Demands Money) केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    सायबर सिटी (Cyber City) म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात (Navi Mumbai City) सदर प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे. सायबर गुन्हेगारांच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे (Online Transations) सामान्य नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे (Common citizens money is being cheated).

    हे सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा साईटवर एखाद्या व्यक्तीच्या नावाने त्याचा फोटो घेऊन बनावट खाते उघडतात. त्या व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तीकडे ऑनलाईन पैशांची मागणी करतात. नाव चेहरा ओळखीचा दिसल्याने बरेच जण पैसेही देतात. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी हा सोपा उपाय शोधला असून यामध्ये हजारो लोकांची फसवणूक होत आहे.

    सर्व सामान्य नागरिकांच्या नावाने बनावट खाते खोलणाऱ्या गुन्हेगारांनी आता शासकिय अधिकाऱ्यांच्या नावाने देखील खाते उघडून पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. युनिट २ क्राईम ब्रँच पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील (Senior Police Inspector Ravindra Patil of Unit 2 Crime Branch Panvel) यांच्या सोबत देखील असाच प्रकार घडला असून त्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून एक इन्स्टाग्राम खाते उघडून त्याद्वारे त्यांचे मित्र आणि नातेवाईकांकडून पैशांची मागणी करण्यात आली. मित्रांचे आणि नातेवाईकांचे पाटील यांना पैशांच्या गरजेसंदर्भात फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

    दरम्यान माझ्या नावे कोणीही पैसे मागितले तर त्यांनी पैसे देऊ नये तसेच पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन रवींद्र पाटील यांनी केले आहे. दोन आठवड्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर (Navi Mumbai Municipal Corporation Commissioner Rajesh Narvekar) यांच्या नावाचे खोटे अकाउंट उघडून पैशांची मागणी करण्यात आली होती.