सत्येंद्र जैन व्हिडिओ लीक प्रकरणी नवा खुलासा; ती व्यक्ती बलात्काराच्या गुन्ह्यातील कैदी

अलीकडेच तिहार जेलमधून एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांचा मसाज करताना दिसत आहे. आता तिहार तुरुंगातील सूत्रांकडून समजले आहे की, ती व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून ती बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी आहे. त्याचे नाव रिंकू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    नवी दिल्ली – तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेल्या सत्येंद्र जैन (Satyendra Jain) व्हिडिओ लीक प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) तुरुंगात असलेले आपचे (AAP) मंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. भाजपचे (BJP) प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज करताना दिसले. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली.

    अलीकडेच तिहार जेलमधून एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांचा मसाज करताना दिसत आहे. आता तिहार तुरुंगातील सूत्रांकडून समजले आहे की, ती व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून ती बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी आहे. त्याचे नाव रिंकू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तत्काळ सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका घेतली. जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले होते.