दोन वर्षापासून फरार असलेल्या दहशतवाद्याला NIA नं केली अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, खानपुरियाचा पंजाबमध्ये अनेक हत्या आणि तसेच दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभाग होता. तो 2019 पासून फरार होता. दहशतवादी खानपुरियावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

  नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( NIA ) नं दिल्लीत एक मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दिल्ली विमानतळावरून फरार ( Most Wanted ) खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. कुलविंदरजीत सिंह ( Kulwinderjit Singh ) उर्फ ​​‘खानपुरिया’ ( Khanpuria ) असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. कुलविंदरजीत 2019 फरार होता. अखेर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला पकडण्यात NIA ला मोठं यश मिळालयं.

  कोण आहे कुलविंदरजीत सिंह?

  कुलविंदरजीत सिंह बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. एनआयएनं दिलेल्या माहितीनुसार, कुलविंदरजीतचा अनेक दिवसापासून पोलीस शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस घोषीत करण्यात आलं होतं.

   

  अनेक दहशवादी कारवायांमध्ये सहभाग

  राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, खानपुरियाचा पंजाबमध्ये अनेक हत्या आणि तसेच दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभाग होता. तो 2019 पासून फरार होता. दहशतवादी खानपुरियावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. खानपुरिया शुक्रवारी बँकॉकहून भारतात आला. एनआयएला याची माहिती मिळताच त्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली. तर,
  90 च्या दशकात नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरण तसेच अन्य राज्यांमध्ये ग्रेनेड हल्ल्यांमध्येही कुलविंदरजीत सिंहचा हात होता. अहवालानुसार, कुलविंदरजीत खानपुरिया हा पंजाबमधील डेरा सच्चा सौदाशी संबंधित आस्थापनांना तसेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मास्टरमाईंड आहे. अनेक राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात होते.