भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनंतर आता ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या, नातेवाईकाच्या घरी आढळली मृतावस्थेत!

घटना रविवारी रात्री उघडकीस आली असुन अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनं (Akanksha Dubey Suicide) पुर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्ता प्रकरणाच तपास सुरू असतानाच आता पुन्हा एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोप येत आहे.  उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु (ruchismita guru Suicide) आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

नातेवाईकाच्या घरी आढळला मृतदेह

घटना रविवारी रात्री उघडकीस आली असुन अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच बलांगीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला.

आत्महत्येपुर्वी आईसोबत झाले भांडण

रुचिस्मिता तिच्या आईने पोलिसांना सांगितले की, आमच्या स्वंयपाक करण्यावरुन भाडंण झालं होतं. मी तिला रात्री 8 वाजता आलू पराठा बनवायला सांगितले होते, पण ती रात्री 10 वाजता बनवणार असल्याचे सांगितले. यावरून आमच्यात वाद झाला. या आधीही तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, ही आत्महत्या की आणखी काही याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूच नेमकं कारण समोर येणार आहे.