विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दुष्ट हेतूने विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांकडून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे. रविराज ताकवणे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पिंपरी :  दुष्ट हेतूने विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांकडून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे. रविराज ताकवणे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टात चालू खटल्यामध्ये ताकवणे यांनी फिर्यादीला त्यांच्या विरूद्ध खटल्यात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी आणि आईला अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत अपमानस्पद शब्द वापरून मेसेजस पाठवून विनयभंग केला. फिर्यादी यांच्या घरी जाऊन ताकवणे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी रविराज ताकवणे यांच्याविरोधात भा. द. वि कलम 354, 354(अ), 195(अ), 504, 506 सह कलम 67, 67(अ ) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी तपास करण्यात येत आहे.