पिंपरीत हाताला काम न मिळाल्यानं नैराश्यातून एकाची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु

पिंपरीत हाताला काम मिळत नसल्यामुळं, रोजगार नसल्यामुळं नैराश्यग्रस्तेतून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करायची आधी माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही, असा मजकूर लिहला होता. पिंपरीतील केजुदेवी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला.

    पिंपरी : कोरोना आणि लॉकडाऊनंतर कित्येकांचे रोजगार, नोकरी गेली आहे. तर कित्येकांचा संसार उधवस्त झाला आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळं त्यांनी जीवनयात्री संपवली आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार पिंपरीत घडला आहे. पिंपरीत हाताला काम मिळत नसल्यामुळं, रोजगार नसल्यामुळं नैराश्यग्रस्तेतून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करायची आधी माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही, असा मजकूर लिहला होता. पिंपरीतील केजुदेवी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला. सुरेश कुमार (रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे व्यक्तीचे नाव आहे.

    दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबरोबर काढला. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ”मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही”, असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी चिट्ठी जप्त केली आहे. मात्र, ही चिट्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का? तसेच, यामागे काही घातपात आहे का? याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.