अहमदनगर जिल्हा बँकेत सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीची गोळी सुटून एकाचा मृत्यू

अशोक बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेचा भरणा भरण्यासाठी शिवाजी रोडवरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊन शाखेत आले होते. त्यांच्यासमवेत सुरक्षारक्षक दशरथ कारभारी पूजारीही समवेत होते. श्रीरामपूर अजित विजय जोशी हेदेखील होते. पार्किंगमध्ये आपली गाडी काढत असताना अशोक बँकेचे सुरक्षारक्षक दशरथ पुजारी यांच्याकडे लोड असलेल्या बंदुकीतून अचानकपणे गोळी सुटून जोशी यांच्या डोक्यात घुसली.

    श्रीरामपूर : अशोक बँकेच्या (Ashok Bank) सुरक्षा रक्षकाकडून (Security Guard) बंदुकीतील गोळी अचानक सुटल्याने नगर जिल्हा बँकेत (Ahmednagar District Co. Bank) कामकाजासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

    अशोक बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेचा भरणा भरण्यासाठी शिवाजी रोडवरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊन शाखेत आले होते. त्यांच्यासमवेत सुरक्षारक्षक दशरथ कारभारी पूजारीही समवेत होते. त्याचदरम्यान बँकेच्या कामकाजासाठी आलेले श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील अजित विजय जोशी हे होते. ते आपले कामकाज आटोपून पार्किंगमध्ये आपली गाडी काढत असताना अशोक बँकेचे सुरक्षारक्षक दशरथ पुजारी यांच्याकडे लोड असलेल्या बंदुकीतून अचानकपणे गोळी सुटून जोशी यांच्या डोक्यात घुसली. अजित जोशी यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात (Sugar Workers Hospital) दाखल करण्यात आले, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान दशरथ पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.