एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, ब्लेडने चिरला गळा; न्यायालयाने आरोपीला घडवली ‘आजीवन’ अद्दल

२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास पीडित मुलगी ही झिलमिली मार्गाने ग्राम कामठा येथील खासगी क्लासला जात होती. यावेळी आरोपी दुर्गाप्रसाद रहांगडालेने तिला रस्त्यात अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी लग्नकर अशी मागणी केली. मात्र, पीडितेने नकार दिल्याने आरोपीने तिच्या डोक्यात हातोडा घातला आणि गळयावर ब्लेडने वार करून तिचा जीव घेतला.

    गोंदिया : गोंदिया येथील झिलमिली गावात खासगी क्लासला (Private Classes) जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीची भर दिवसा हत्या (Murder) करण्यात आली होता. एकतर्फी प्रेमातून हातोड्याने मारहाण आणि ब्लेडने गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २१ वर्षीय आरोपीला न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासाची (Rigorous Imprisonment For Life) शिक्षा सुनावली आहे. अशी गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील पहिली घटना असून न्यायालयाने १० महिन्यातच निकाल लावत शिक्षा सुनावली आहे.

    २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास पीडित मुलगी ही झिलमिली मार्गाने ग्राम कामठा येथील खासगी क्लासला जात होती. यावेळी आरोपी (Accused) दुर्गाप्रसाद रहांगडालेने तिला रस्त्यात अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी लग्नकर अशी मागणी केली. मात्र, पीडितेने नकार दिल्याने आरोपीने तिच्या डोक्यात हातोडा घातला आणि गळयावर ब्लेडने वार करून तिचा जीव घेतला.

    याप्रसंगी शेतात मोटारपंप दुरूस्त करीत असलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. तसेच, पोलिसांनी आरोपीकडून हत्यारे जप्त करत न्यायालयात सर्व पुरावे दाखल केले. याबाबत सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे साक्षीदारांचे पुरावे, न्यायवैद्यक पुरावे व प्रत्यक्ष पाहणी साक्षीदारांची साक्ष पुरावे ग्राह्य धरून आरोपीस आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.