दिल्लीत भररस्त्यात तरुणाची हत्या, एका संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

वादातून एका 25  वर्षीय युवकाची तीन ते चार जणांनी मिळून भररस्त्यात हत्या (murder) केली. मात्र अन्य लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्यामुळं तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, ही घटना काल सकाळी घडली आहे, त्यानंतर आता आलेल्या ताज्य़ा माहितीनुसार चार आरोपीतील एका संशयित आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चौकशी सुरु असून, पुढील तपास पोलीस करताहेत.

    नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर (Malviya nagar) परिसरात वादातून एका 25  वर्षीय युवकाची तीन ते चार जणांनी मिळून भररस्त्यात हत्या (murder) केली. मात्र अन्य लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्यामुळं तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, ही घटना काल सकाळी घडली आहे, त्यानंतर आता आलेल्या ताज्य़ा माहितीनुसार चार आरोपीतील एका संशयित आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चौकशी सुरु असून, पुढील तपास पोलीस करताहेत.

    दरम्यान, मृत तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचं (hotel management) शिक्षण घेतलं होतं. मृत तरुणाचं चार-पाच लोकांसोबत वाद झाला. यानंतर या लोकांनी मृत तरुणावर हल्ला करण्यास सुरूवात केली. तिथून मृत तरुणाने पळ काढला, परंतू चार ते पाच जणांनी त्याला गाठले. त्यानंतर चाकून व दगडाने ठेचून मृत तरुणांवर हल्ला केला. यात मृत तरुन 90 टक्के जखमी झाला होता, दरम्यान, तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला होता. त्यानंतर आज एका संशयिताल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास व शोध पोलीस घेत आहेत.