प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पलामूच्या एका गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे दहा वर्षांच्या मुलाला रात्रभर आई आणि लहान भावाच्या मृतदेहांसोबत राहावे लागले. सकाळ झाल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

  पलामू : पलामूमध्ये (Palamu) एक धक्कादायक घटना (Horrible News) समोर आली आहे. एका महिलेने तिच्या दोन मुलांसह गळफास लावून घेतला (A Woman Hanged Herself Along With Her Two Children), ज्यामध्ये महिला आणि एका ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Death) झाला. दुसरीकडे, १० वर्षांच्या मुलाने कसा तरी फास उघडून आपला जीव वाचवला (A 10 Year Old Son Somehow Managed To Untie The Rope And Save His Life).

  ही घटना काल रात्री मनाटू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगिया गावात घडली. सकाळी मुलाने शेजारच्यांना माहिती दिल्यावर ही घटना उघडकीस आली. गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

  गावातील विकास दास यांची पत्नी शांती देवी (३८) यांनी काल रात्री घराच्या शेडमध्ये वस्तू ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूला साडीचे तीन दोर बनवले आणि मुलांना ‘चला झोका खेळूया’ असे सांगितले. महिलेने आधी दोन्ही मुलांना एक-एक करून फासावर लटकवले, त्यानंतर तिने स्वत: गळ्याला फास लावून आत्महत्या केली. यादरम्यान १० वर्षीय छोटूने कसातरी फास उघडून आपला जीव वाचवला. तर आई आणि ८ वर्षीय कुणाल याचा मृत्यू झाला.

  सकाळी छोटूने शेजाऱ्यांना माहिती दिली

  आई आणि भावाचे फास कापून छोटू स्वतःच सापळ्यातून बाहेर पडला आणि त्यांना खाली आणले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर छोटू रात्रभर आई आणि भावाच्या मृतदेहांसोबत खोलीत थांबला. सकाळी घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या नातेवाईकाला त्याने माहिती दिली. यानंतर लोकांचा जमाव त्याच्या घरी गेला. त्यापैकी एकाने पोलिसांना माहिती दिली.

  पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे शांती होती तणावाखाली

  असे सांगितले जात आहे की, महिलेचा पती विकास दासने एक वर्षापूर्वी दुसरं लग्न केलं होतं आणि तो दुसऱ्या पत्नीसोबत बाहेर कुठेतरी राहतो. शांती आणि तिच्या मुलांकडे तो लक्ष देत नव्हता. अशा परिस्थितीत शांतीसाठी दोन मुलांचे संगोपन करणे डोंगरासारखे झाले होते. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर ती खूप तणावाखाली जगत होती. विकास त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही काही दिवसांसाठी गावी घेऊन आला होता. इथे दोन बायकांमध्ये खूप वाद व्हायचा. त्यानंतर तो दुसऱ्या पत्नीसोबत बाहेर गेला. शांती आणि विकासाचे फोनवरून वारंवार वाद व्हायचे.

  पोलिसांनी पतीला बोलावले

  मनाटू पोलिस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी सांगितले की, रंगिया गावात एक महिला आणि तिच्या मुलाच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पतीने दुसरे लग्न केल्यानंतर ती महिला खूप तणावाखाली होती असे सांगितले जात आहे. तिचा पतीसोबत सातत्याने वाद होत असे. पतीला फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. त्याला येथे बोलावण्यात आले आहे. नियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे.