खाकीवरच बालंट! लाच स्वीकारताना पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांना अटक

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून डहाणू स्टेशनवर सापळा रचण्यात आला आणि पठाण व नरवाडे यांना सापळा रचून पंचांसमक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले.

    पालघर : पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अकील पठाण (Police Naik Akil Pathan of Palghar Lohmarg Police Station) व पोलीस शिपाई समाधान नरवाडे (Police constable Saadhan Narwade) यांनी गुटखा विक्रेत्याकडे (Gutkha Seller) दरमहा दहा हजार रुपये लाचेची मागणी (Demand Ten Thousand Rupees) केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केल्यानंतर या विभागाकडून डहाणू स्टेशनवर (Dahanu) सापळा रचण्यात आला वरील दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

    गुटखा वाहतूक करताना तक्रारदारास पकडण्यात आले होते. त्यावेळी कारवाई थांबविण्यासाठी व पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या दोघांनी तक्रारदाराकडे दरमहा दहा हजार रुपयांच्या मागणीचा तगादा लावला होता.

    याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून डहाणू स्टेशनवर सापळा रचण्यात आला आणि पठाण व नरवाडे यांना सापळा रचून पंचांसमक्ष दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले.

    या कारवाईत पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास पोहोवा अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, विद्या मांजरेकर, दीपक सुमडा, नवनाथ भगत, पोलीस नायक सखाराम दोडे, स्वाती तारवी यांनी कारवाई यशस्वी केली.