एनआयएच्या छाप्यांनंतर पीएफआयच्या केरळ बंदला हिंसक वळण; पोलिसांवर हल्ला

कोल्लममध्ये मोटारसायकलवरून आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी दोन पोलिसांवर हल्ला केला. पीएफआयची ही भूमिका पाहता राज्य सरकारने पोलीस दलाची अतिरिक्त तैनाती केली आहे. गुरुवारी एनआयएने ईडीसह उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, ओडिशा आणि राजस्थानमध्ये छापे टाकले.

    नवी दिल्ली : एनआयएने १५ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ९३ ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले. त्यानंतर पीएफआयने शुक्रवारी केरळ बंदची (Kerala Close) हाक दिली आहे. एनआयएच्या (NIA) छाप्याला विरोध करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक वळण घेतले.

    राजधानी तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) आणि कोट्टायममध्ये (Kottayam) पीएफआय कार्यकर्त्यांनी सरकारी बस आणि वाहनांची तोडफोड केली आहे. कोल्लममध्ये मोटारसायकलवरून आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी दोन पोलिसांवर हल्ला केला. पीएफआयची ही भूमिका पाहता राज्य सरकारने पोलीस दलाची अतिरिक्त तैनाती केली आहे.

    गुरुवारी एनआयएने ईडीसह उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, ओडिशा आणि राजस्थानमध्ये छापे टाकले. या छाप्यात एनआयएचे ३०० हून अधिक अधिकारी सहभागी होते. यादरम्यान तपास यंत्रणेने १०६ पीएफआय कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.