Attack on female assistant police inspector in fight with Rajapeth police, case filed against four persons

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहत परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. संजय सोळंके असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे(Police commit suicide in Akola after being harassed by seniors; Sensational allegations in suicide note ).

    अकोला : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहत परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. संजय सोळंके असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे(Police commit suicide in Akola after being harassed by seniors; Sensational allegations in suicide note ).

    आत्महत्येस ठाणेदार आणि पोलीस दलातील बाबू जबाबदार असल्याचे आत्महत्या केलेल्या संजय सोळंके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर या पोलीस कर्मचाऱ्याने एक सुसाईड नोट लिहिली होती.

    अकोल्याच्या पोलीस मुख्यालयात संजय सोळंके हे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज अकोल्याच्या पोलीस वसाहत परिसरात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. आज सोमवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास खदान पोलीस कर्मचाऱ्यांना लिंबाच्या झाडाला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. सद्यस्थित खदान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. याप्रकरणी खदान पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

    सूत्रांच्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी मृतक संजय सोळंके यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याच नमूद आहे. ठाणेदार आणि पोलीस दलातील बाबू यांच्याकडून वेळो-वेळी धमकी देने या कारणास्तव मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तरीही या संदर्भात अधिक माहिती कळू शकली नसून पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार विजय नाफडे हे करीत आहे.