प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत पथकाने लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी लातूरमध्ये विस्तार अधिकाऱ्याला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. आता नांदेडमध्येही लाचलुचपत पथकाने अवैध वाळू वाहतुकीची वाहने चालवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याला २१ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे(Police officer arrested for taking bribe).

    नांदेड : गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत पथकाने लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी लातूरमध्ये विस्तार अधिकाऱ्याला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. आता नांदेडमध्येही लाचलुचपत पथकाने अवैध वाळू वाहतुकीची वाहने चालवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याला २१ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे(Police officer arrested for taking bribe).

    शिवाजी पाटील असे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे असून शिवाजी हे नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्यासोबत मारुती कांबळे नामक आणखी एक व्यक्ती होता. वाळूचे तीन टिप्पर चालवण्यासाठी २१ हजारांच्या लाचेची मागणी या पोलीस कर्मचाऱ्याने केली होती.

    दरम्यान, लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत पथकाला दिली. ओंकारेश्वर नगर जवळ शिवाजी पाटील आणि मारोती कवळे यांनी १४ हजार रुपये रोख रक्कम आणि फोन पे वरून ७ हजाराची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.

    यावेळी तपासणीत शिवाजी पाटील याच्या खिशात अडीच लाख रुपये देखील सापडले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील आणि खासगी व्यक्ती मारूती कवळे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.