दिल्ली आणि मुंबईतील तरूणी नागपुरात यायच्या आणि… ऑनलाईनच व्हायची सर्व अरेंजमेंट

नागपुरातील गणेश पेठ परिसरात असलेल्या ब्रिज इन हॉटेल वर नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड घातली. या धाडीत पोलिसांना दिल्ली आणि मुंबईतील तरूणी नागपुरात येऊन सेक्स रॅकेट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे(Police raid sex racket in Nagpur).

    नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या धाडीत प्रीतम दहिकर, त्याची पत्नी सीमा दहिकर, राज ईखान आणि समीर शेट्टे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून यापैकी समीर आणि राज हे फरार आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरील सर्व आरोपी नागपुरातील गणेशपेठ परिसरामध्ये असलेल्या हॉटेल ब्रिज इन येथे महिनेवारीने रूम भाड्याने घेऊन दिल्ली, मुंबई आणि कलकत्ता येथील तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या.

    नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींसोबत संवाद साधला आरोपींनी दोन मुलींचा नऊ हजार रुपये सौदा पक्का केला त्यानंतर पोलिसांनी हॉटेल ब्रिज ईन येथे धाड घातली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हे ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना मुली उपलब्ध करून देत असत. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.